तुमच्या RIVULIS ठिंबक नळी सोबत REELVIEW नि: शुल्क प्राप्त होते. यामुळे तुमच्या पीकाची उपग्रह प्रतिमा तसेच पीक उत्पादन सल्ला थेट आपल्या फोनवर पाठवला जातो.सुरूवात कशी करावी आणि Reelview तुम्हाला लहानात लहान समस्या सोडविण्यासाठी कशी मदत करू शकते ते पहा.
ReelView चा QR कोड स्कँन करा
तुमचे खाते सेट करा (हे सोपे आहे)
तुमचे क्षेत्र सेट करण्यासाठी आमच्या मार्गदर्शिकेचा वापर करा.
- English
- मराठी
- हिन्दी
- தமிழ்
- ಕನ್ನಡ
- ગુજરાતી
- తెలుగు
वनस्पती निर्देशांक
वनस्पती ओलेपणा परिवर्तनशीलता
- कालांतराने तुमच्या पिकांच्या विकासाचे विश्लेषण करा आणि मागील कित्येक वर्षाच्या ऐतिहासिक डेटासह पूर्वीच्या हंगामातील प्रतिमांची तुलना करा.
- अॅपमधील रंग बदलांद्वारे दर्शविल्या जाणार्या वनस्पती आणि वनस्पती ओलेपणातील अचानक बदल शोधून, तुम्ही तुमच्या फोनवर थेट समस्या शोधू शकता.
- तुमच्या क्षेत्रांसाठी आवश्यक स्थानिक हवामान डेटा प्रदान करते.
- कलर कोडिंग तुमच्या शेतातील वनस्पतींची घनता आणि वनस्पतींच्या ओलेपणातील भिन्नता व्यक्त करते, ज्यामुळे तुम्हाला सिंचन आणि वनस्पतींच्या आरोग्यासंबंधी संभाव्य समस्या अधिक चांगल्या प्रकारे शोधण्यात मदत होते.
- उपग्रहिय NDVI इमेजरी तुम्हाला सिंचन, खत, रोग आणि इतर समस्या प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसण्याआधीच शोधण्यात सक्षम करते.
- English
- मराठी
- हिन्दी
- தமிழ்
- ಕನ್ನಡ
- ગુજરાતી
- తెలుగు
मी REELVIEW साठी नोंदणी कशी करू?
REELVIEWची नोंदणी करण्यासाठी खालील तीन बाबींचे अनुसरण करा.
मी नवीन क्षेत्र कसे निर्धारित करू शकतो?
मुख्यपृष्ठावर क्षेत्र्याच्या नकाशा समोरील + चिन्ह निवडा. REELVIEW मार्गदर्शिकेतील क्षेत्रनिवड संबंधीचा Video पाहून आपण आपले क्षेत्र निवडू शकता.
मी वनस्पति निर्देशांक प्रतिमेवर काय पाहतो?
REELVIEW पहा “तुमचा फील्ड इमेजरी व्हिडिओ कसा वाचायचा ते शिका”.
मी माझ्या शेताचा संपूर्ण इतिहास का पाहू शकत नाही?
डेटाबेसला ऐतिहासिक प्रतिमा एकत्र करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. जेव्हा ते पूर्ण होईल, तेव्हा तुम्ही 3 वर्षांच्या प्रतिमा पाहण्यास सक्षम असाल. आपल्याला समस्या असल्यास, आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधा.
प्रतिमा उपलब्ध नाही असा संदेश का प्राप्त होत आहे?
प्रतिमांची उपलब्धता ढगाळ वातावरणामुळे प्रभावित होते. पर्यायी तारीख निवडण्याचा प्रयत्न करा.
मी एक Rivulis उत्पादन विकत घेतले आहे परंतु माझ्याकडे REELVIEW QR कोड का नाही?
हा QR कोड तुमच्या फोनने स्कॅन करा आणि तुमच्या फोनवर RELVIEW उघडल्यावर, “माझ्याकडे उत्पादन QR कोड नाही” हा पर्याय निवडा. तुम्ही खरेदी केलेले Rivulis उत्पादन निवडा आणि नोंदणी सुरू ठेवा. नोंदणीसंबंधी अधिक मदतीसाठी 3 सोप्या बाबींचे दर्शविल्याप्रमाणे अनुसरण करा.
खालच्या बटन वर क्लिक करा आणि जेव्हा REELVIEW तुमच्या मोबाईल स्क्रीनवर उघडेल तेव्हा ” I do not have Product QR Code” या संदेशावर क्लिक करा. तुम्ही विकत घेतलेल्या रिवुलीस उत्पादनाची निवड करा आणि नोंदणी करणाची प्रक्रिया चालू ठेवा. नोंदणी करण्यासाठी आणखी मदत हवी असेल तर नोंदणीकरणासाठी असणाऱ्या केवळ तीन सूचनांचे पालन करा.
मी वनस्पतीच्या ओलेपणाच्या परिवर्तनशीलतेसंबंधीच्या प्रतिमेवर काय पाहू शकतो?
REELVIEW पहा “तुमचा फील्ड इमेजरी व्हिडिओ कसा वाचायचा ते शिका”.
मी अधिक क्षेत्र का तयार करू शकत नाही?
REELVIEW ला क्षेत्राची (हेक्टर / एकर) विनामूल्य प्रतिमा निरीक्षणासाठी विहीत मर्यादा आहे.
तुम्ही तुमच्या REELVIEW मर्यादेपर्यंत पोहोचल्यास, तुम्ही तुमच्या वर्तमान क्षेत्रापैकी एक हटवू शकता आणि नवीन क्षेत्र जोडू शकता किंवा अधिक कव्हरेजसाठी मन्ना इरिगेशनकडे खाते नोंदणी करू शकता.”
फील्डपासूनचे अंतर खूप दूर आहे असे सांगणारी मला त्रुटी का येत आहे?
प्रत्येक सबस्क्रिप्शनसाठी सर्व क्षेत्र एएकमेकांपासून ठराविक अंतराच्या आतमध्ये असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला जास्त अंतरावरील फील्डचे निरीक्षण करायचे असेल, तर त्यासाठी मन्ना सिंचन खात्याचा विचार करा.
मी एक REELVIEW खाते उघडले आहे, मी माझ्या खात्यात पुन्हा लॉग इन कसे करू शकतो?
तुमच्या मोबाईल फोनवरील ब्राउझरमध्ये https://reelview-rivulis.com/ हा वेब पत्ता प्रविष्ट करा आणि तुमचा फोन नंबर वापरून लॉगिन करा. तुम्ही आधीच लॉग इन केले असल्यास, ते तुम्हाला थेट ॲपवरील तुमच्या होम पेजवर घेऊन जाईल. ॲप शोधणे सोपे करण्यासाठी, तुम्ही तुमच्या होम स्क्रीनवर REELVIEW ॲपची लिंक जोडू शकता.
अँड्रॉइड:
तुम्ही ॲपच्या मुख्यपृष्ठावर असताना: 1. स्क्रीनच्या डाव्या कोपर्यातील मेनू बटण निवडा. 2. मेनू स्क्रीनवरून मुख्यपृष्ठावर जोडा” ची निवड करा. आता तुमच्या मोबाइलला स्क्रीनवर “REELVIEW” एपवचे चिन्ह निर्माण होईल.
आयफोन:
तुम्ही ॲपच्या मुख्यपृष्ठावर असताना: 1. सफारी पृष्ठाच्या तळाशी असलेले चिन्ह दाबा. 2. खाली स्क्रोल करा आणि “मुख्यपृष्ठावर जोडा” हा पर्याय निवडा. 3. “जोडा” हे चिन्ह दाबा. REELVIEW एपचे चिन्ह तुमच्या मोबाईलच्या मुख्यपृष्ठावर निर्माण होईल.
मी युरोड्रिप उत्पादन खरेदी केले आहे, मी REELVIEW वापरू शकतो का?
होय, युरोड्रिप ब्रँडेड उत्पादनांकरिता REELVIEWचा वापर होऊ शकतो.
*फक्त निवडक भौगोलिक प्रदेशांसाठी उपलब्ध. अटी व नियम लागू. संपूर्ण अटी व शर्तींसाठी येथे क्लिक करा.